चुकूनही हा मासा कधीही खाऊ नका
मुंबई : बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही निवडक मासे आरोग्याला घातक देखील असतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, याला मंगूर, मंगरूळ मासाही काही जण म्हणतात. मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात तो जगू शकतो. मांगूर माशाच्या काही प्रजाती धोकादायक आहेत.
थायी मांगूर मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो. अगदी चिखलातही. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मागूरची लांबी असते. मानेजवळ काटे असतात. त्याची विचित्र सवय आहे.
तो काहीही खातो. त्यामुळे त्याचे मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. त्यामुळे हानीकारक आजारांचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्याच्यावर बंदी आणलेली आहे. तरीही त्याची विक्री अनेक ठिकाणी जोरात सुरू असते.
एवढंच नाही बिना पाण्याशिवायही हा मांगूर मासा फार वेळ बाहेर जिवंत राहतो,उड्या मारतो. पण मांगूर मासा हा आरोग्याला हानीकारक असल्याने मांगूर खाण्यावर आणि विक्रीवर बंदी आहे.
मांगूर माशात अनेक प्रकार आहेत, यात केरळ सरकारने पहिल्यांदा 1998 मध्ये मांगूर माशावर बंदी घातली होती. हा मासा स्वस्त मिळतो अगदी 80 ते 130 रुपये रूपये किलोने याची विक्री होते. म्हणूनच दुर्देवाने ज्यांच्याकडे आर्थिक चणचण आहे, अशी कुटूंब हा मासा जास्त खरेदी करतात.
यानंतर सन २००० मध्ये एनजीटीच्या आदेशानंतर भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मांगूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे.
मुख्यतः देशी मांगूर आणि हायब्रीड थाई मांगूर या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते.
परंतु विदेशी थाई मांगूर मासा मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. तो दिसायला देशी माशासारखाच दिसतो, त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक ओळखणे आवश्यक आहे.
मार्केटमध्ये टबमध्ये कमी पाण्यात जिवंत मासा म्हणून विकला जातो. या माशाची किंमत 80 ते 130 रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. मोठ्या तोंडामुळे हा मासा तुलनेने मोठी शिकार संपूर्ण गिळण्यास सक्षम आहे.