माणगांव बाजारपेठेत वानराचा मुक्त संचार
माणगांव बाजारपेठेत वानराचा मुक्त संचार
अशा प्रकारची वानराची प्रजात ही माणगांव तालुक्यातील टोऴ-आंबेत घाटरस्ता, नांदवी आंबेत घाट आणि साई घाटामध्ये प्रामुख्याने पहावयास मिऴते. कदाचित हे वानर तिथुनच कऴपातुन भरकटुन बाजारपेठेत आल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होत आहे.
मागील 5 वर्षांपुर्वी देखील अशाच प्रकारच्या एका वानराने माणगांव शहरात प्रवेश केला होता. मात्र ते जंगली असल्याचे भासत होते. पण हा वानर चर्चेचा विषय बनला असला तरी कारणे पर्यावरणाचा ढासऴता समतोल, अमर्याद व्रुक्षतोड, जंगली आपत्ती (वणवे) यांसारख्या कारणांमुऴे देखील जंगली प्राण्यांनी शहराचा रस्ता पकडला असावा हे नाकारता येणार नाही.
हे वानर माणगांवकरांसाठी मौजमजा आणि कुतुहुलाचा विषय जरी बनले असले, तरी या गोष्टींकडे गांभिर्याने पहाण्याची देखील गरज आहे. याकरिता माणगांव तालुका सामाजिक वनीकरण विभाग (वनखाते) यांनी याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असे देखील माणगांवकर नागरीकांकडुन बोलले जात आहे..