रा.जि.प. शाळा उसर्लीखुर्द येथे विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रम 


पनवेल (प्रतिनिधी) :- रा.जि.प. शाळा उसर्ली खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये विज्ञान दिन व थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या कार्याचा परिचय, रमण ईफेक्ट याविषयी माहीती, विज्ञान कथा सादरीकरण, विज्ञानगीतांचे गायन, विज्ञान जनजागृती फेरी, पर्यावरण संवर्धन मूकाभिनय पथनाट्य सादरीकरण, विज्ञानकोडे स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, यूट्यूब विज्ञान संकल्पना व्हिडीयो पाहून गटचर्चा, ग्रामस्थांसमोर विद्यार्थ्यांचे विज्ञान विषय व प्रबोधन, पर्यावरण समस्या व त्यावर उपाय, वृक्ष संगोपन सादरीकरण, विज्ञानगीतांचे गायन, परिसर भेट व सहभोजन यांसारखे अनेक उपक्रम पार पडले.

यावेळी शाळास्तर विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग होता. त्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक प्रगती म्हात्रे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक वर्गाने प्रदर्शनास भेट दिली.

याप्रसंगी विशेष शैक्षणिक कार्याबद्दल मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते सर्व शिक्षकवृदांचा सन्मान, सत्कार करण्यात आला. तसेच, स्पर्धेत विजयी स्पर्धकांना परितोषके देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामस्थ उसर्लीखुर्द विश्वास भगत, सरपंच सौ. मनिषा वाघमारे, उपसरपंच गणेश भगत, सदस्य प्रसाद भगत, सर्व मान्यवर सदस्य, ग्रामसेवक रेवननाथ ढेरे व त्यांचे सर्व सहकारी, किरण भगत तसेच केंद्रप्रमुख सौ आंकिता हुद्दार, शिक्षकवृंद सुनिता काळे, चित्ररेखा जाधव, वैशाली आंबुर्ले, सारिका घाडगे,  रा.जि.प. शाळा उसर्लीखुर्दचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे अस्मिता घाडगे, कल्पनाताई भोईर, आंगणवाडी सेविका शकुंतला भगत यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog