🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून पेपर सोडवला, परीक्षा केंद्राला एक लाखाचा दंड 

बीड : बीड जिल्ह्यातील रायमोहा येथील परीक्षा केंद्रावर खाली बसून पेपर सोडवण्याच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने परीक्षा केंद्राला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांना खाली बसवून अशा पद्धतीने परीक्षा द्यायला लावू नये हा त्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे या पद्धतीचा दंड लावण्यात आलेला आहे.

कोणतीही व्यक्ती ४० मिनिटे ते एक तासभर जमिनीवर बसू शकते आणि उत्तरे लिहू शकते. मात्र या विद्यार्थ्यांनी खाली बसून पेपर सोडवला, नक्की किती प्रश्न त्यांनी खाली बसून सोडवले याबाबतचा खुलासा ही खंडपीठाने मागवलेला आहे. याबाबत बोर्डालादेखील नोटीस देऊन खुलासा करण्याबाबत सांगितलं आहे.

हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात सू-मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. १२ वी इंग्रजीचा पेपर या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना खाली बसून सोडवावा लागला होता.

बीड तालुक्यातल्या रायमोहामध्ये अतुल कला आणि वाणिज्य महाविद्यालयांत बारावीच्या विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून द्यावी लागली. परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिवाय विद्यार्थ्यांना जमिनीवर धुळीत बसून परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी पूर्वतयारी का केली नाही आसा प्रश्न निर्माण होत आहे.

Comments

Popular posts from this blog