विळे गावामध्ये महाशिवरात्री उत्सव संपन्न


माणगांव (प्रतिनिधी) :-
विळे गावठाण श्री महादेव मंदीरामध्ये महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन विळे गावठाण ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या निमित्ताने सकाळी 8 ते दुपारी 1 वाजे पर्यंत शिवलिलामृत पारायण तसेच प्रवचन, हरीपाठ, किर्तन, हरिजागर या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाऴी 8 वाजल्यापासून धर्मध्वजारोहण, अभिषेक, श्री शिवलिलामृत पारायण, ग्रंथप्रवचन, दिपोत्सव, हरिपाठ ,किर्तन व रात्रौ 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हरिजागर करण्यात आला.

त्यानंतर श्री महादेवाच्या पालखीची मिरवणूक विळे गावठाण ते विळे गावातून कोकणी खालुबाजा व लेझिमनृत्याच्या तालावर काढण्यात आली. यानंतर काल्याचे किर्तन श्री स्वामी आळंदीकर महाराज यांचे झाले या वेळी विळे गावठाण ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या आनंदमयी, भक्तीमय, हर हर महादेव शिवशंभोच्या जयघोषात विळे गावठाण परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी श्री महादेव मंदीर ट्रस्ट विळे गावठाणचे अध्यक्ष बबनराव देशपांडे, उपाध्यक्ष गणेश सकपाळ, सेक्रेटरी अरविंद मेथा, खजिनदार जितेंद्र मेथा, सहसेक्रेटरी मयुर शिवदे तसेच सर्व सदस्य विलास देशमुख, विश्वनाथ देशमुख, सुनिल झगडे, नथुराम पाटणकर, रविंद्र देशमुख, मंगेश जाधव, रमेश देशमुख, अनंत बांदल, रामचंद्र कदम, शांताराम शेलार, सुभाष गायकवाड, संतोष जाधव, अजय देशमुख, एकनाथ पोकळे, प्रकाश मालुसरे, राजेंद्र देशमुख या सर्वांनी व सर्व शिव-भक्त ग्रामस्थांनी आणि युवा ग्रामस्थ सागर गायकवाड, अनिकेत महामुनी व सौरभ देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Popular posts from this blog