नऊवारी नेसलेल्या तरुणीची 
"टिकटॉक" शिव जयंती 
व्हिडीयोचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

रायगड (किरण बाथम) :- टिकटॉक ने आबालवृद्ध वेडावले आहेत. प्रत्येकजण विविध गमती-जमतीचे व्हिडीयो नेहमीच टाकून धम्माल करताना दिसतात. पण शिवप्रेमासाठी या टिकटॉकचा खुप समर्पक वापर एका व्हिडीयोत पाहायला मिळतो.

टिकटॉक पाहाण्याची हौस असलेल्यांमध्ये हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नववारी साडीतील एका तरुणीचा हा टिकटॉक व्हिडीयो लाखो लोकांच्या व्हॉट्स अॅपच्या स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे.

19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणारी शिवजयंती हे या व्हिडीयो व्हायरल होण्यामागचं खास कारण आहे. या व्हिडीओमध्ये नववारी नेसलेली तरुणी पारंपारिक अलंकार परिधान करुन रस्त्याने चालत जाताना दिसत आहे. तिच्या समोर येऊन अनेकजण नतमस्तक होताना दर्शन घेतात.
व्हिडीओ बघताना जिजाऊंच्या लेकीला मुजरा घालत असल्याचे वाटते. मात्र काही सेकंदानंतर कॅमेरा पुढच्या बाजूने दाखवताच त्या तरुणीच्या हातात साक्षात छत्रपती शिवाजी
महाराजांची मूर्ती असते. शिवरायांच्या मूर्तीला पाहून सर्वजण नतमस्तक होत असल्याचे दिसते.
  दरम्यान, हा व्हिडीओ आता येऊ घातलेल्या शिवजयंती निमित्ताने सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवप्रेमींचा या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog