गांजा वाहतूक करणाऱ्याला खोपोली पोलीसांकडून अटक, १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त 

संग्रहित छायाचित्र

रायगड (किशोर केणी) :
मागील काही दिवसांपासून खोपोली, खालापूर परिसरात चोरट्या पद्धतीने गांजा विक्री होत असल्याबाबत जनतेकडून तक्रारी येत होत्या त्यावर निर्बंध घालण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर व पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून हद्दीत होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या हालचालीवर लक्ष ठेऊन त्या प्रमाणे मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीनुसार रवींद्र रामराव पवार वय-२७, रा. शिवना, ता. सिलोड, जि.औरंगाबाद याला ताब्यात घेऊन त्याचेकडे गांजा अंमली पदार्थ व मोटारसायकल असा १ लाख ३० हजार ७६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याप्रमाणे आरोपी विरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गु.र.जि.नं.३०/२०२०, गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (सी), २० (बी) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतीश आस्वर हे करत आहेत. सदर माल कुठून आणला व कोणास विक्रीसाठी आणला यांचा सखोल तपास करून खोपोली, खालापूर मधील गांजा विक्री समूळ नष्ट करण्यात येत आहे. सदर कारवाई पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला, पो.ह./राजेंद्र पाटील, सुधीर मोरे, पो.शि./प्रदीप खरात, प्रविण भालेराव, कादर तांबोळी, जयेश कुथे यांनी भाग घेतला आहे.

Popular posts from this blog