माणगांवच्या कचेरीरोड प्रवेशद्वारालाच अस्वच्छतेचे दर्शन; लोकप्रतिनीधी उदासीन

माणगांव (महेश शेलार) :- 
माणगांवचे कचेरीरोड प्रवेशद्वारालाच हायवेलगत असलेल्या नाक्यावरील काॅर्नरवर गणपत यांच्या पानगादी जवळील हायवेवरील गटार तुंबले आहे. या गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनीधी दररोज सकाळी फेरफटका मारावयास येत असतात परंतु या ठिकाणची दुर्दैवी अवस्था पाहून त्यावर कोणतीही उपाय योजना करुन येथील परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सारेच उदासीन असल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. येथे अत्यंत दुर्गंधी येत आहे. माणगाव शहरातील महत्वाची कार्यालये शाळा-काॅलेज, प्रांताचे निवास, तहसिलदार निवास, पोलीस कचेरी, शहरातील मुख्य वसाहतींकडे येता जाता अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

नगरपालिका प्रशासनाने ही गंभीरबाब लक्षात घेऊन या ठिकाणी दैनंदिन स्वच्छते बाबतची खबरदारी घ्यावी अशी जनतेची मागणी आहे. कचेरीरोड हे माणगावचे नाक आहे. यामुळे शहर स्वच्छतेला गालबोट लागत आहे. याबाबत नगरसेवक, विरोधी पक्षनेते सचिन बोंबले यांना प्रस्तुत प्रतिनीधी यांनी विचारले असता त्यांनी आपण स्वतः या ठिकाणी उभे राहुन एक दोन वेळेस सफाई करुन घेतली होती, परंतु येरे माझ्या मागल्या अशी दुर्दैवी स्थिती पुन्हा येथे झाली आहे. कचरा उचलणारी व्यवस्था अधून-मधून कोलमडते या बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घंटागाडी कधी कधी येत नाही अशी नागरीकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी पुन्हा प्लास्टिक मिश्रीत कचऱ्याचे ढीग पुन्हा नजरेस पडत आहेत. प्लास्टीक पिशव्यांचा वापर पुन्हा होऊ लागला असल्याचे चित्र आहे. माणगांव शहराचे स्वच्छतेसाठी फार मोठा निधी खर्च होत असून या ठिकाणी संबधित यंत्रणांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. हायवेवरील गटार देखील तुंबले आहे. या दैनंदिन पुनरुद्भवी समस्यांकडे दुर्लक्ष न करता, उदासिनता झटकुन नियमीत स्वच्छता करणे आवश्यक आहे. अशी जनतेची मागणी आहे.

Popular posts from this blog