नागोठणे येथे देना बँकेचे एटीएम अनेक महिन्यांपासून बंद, नागरिकांची गैरसोय.!
महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाने घेतली दखल
नागोठणे (प्रविण बडे) :-
नागोठणे बाजार पेठेतील अनेक महिन्यांपासून बंद असलेले देना बँकेचे एटीएम मशीन कार्यान्वीत करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघ नागोठणे शाखे तर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शाखा अध्यक्ष भाई टेमकर व महिला विभाग अध्यक्षा कल्पनाताई पाटील यांनी देना बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन दिले.
येथील एटीएम सुविधा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यांत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन देना बँक व्यवस्थापक यांना सदरचे निवेदन दिले आहे.