स्वयंभू बेलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न
माणगांव (प्रतिनिधी) :-
लोणेरे विभागातील पन्हऴघर विभागातील मांगरुळ येथे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर स्वयंभू बेलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रमोदशेठ घोसाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री. शास्त्री, शिवसेना क्षेत्र संघटक अरुण चाळके, जिल्हा परिषद सदस्या सौ. अमृताताई हरवंडकर, जितेंद्र सावंत, माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र तेटगुरे, राजेश पानवकर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब करकरे, संजय घोसाळकर, शिवसेना विभाग प्रमुख रवी टेंबे, तसेच शिवसेनेचे आजी-माजी सर्व पदाधिकारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
महाशिवरात्रीचे कार्यक्रम भरपूर असल्यामुळे आमदार साहेबांनी कार्यक्रमाची सुरुवातच शंभू महादेव मंदिराच्या भूमीपूजनाने केली. तसेच माणगांव तालुक्यातील गोरेगाव, निजामपूर इत्यादी विविध ठिकाणी जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.
तसेच कार्यक्रम सर्वच ठिकाणी असल्याने आमदार महोदय सर्व ठिकाणी पोहोचू शकत नसल्यामुळे महाड, पोलादपूर तालुक्यातील विविध ठिकाणी रायगड जिल्हा युवा सेना युवा अधिकारी विकासशेठ गोगावले यांनी भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेतला. प्रत्येक ठिकाणी श्री. गोगावले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यावेळी त्या-त्या विभागातील शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख शरीफभाई हर्गे, प्रसाद गुरव, सुधीर पवार, प्रकाश गोरीवले, युवा सेना अधिकारी फर्जन पालेकर, इब्राहिम डावले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.