पुण्यात कागद पुठ्ठा गोदामाला भीषण आग
पुणे (प्रतिनिधी) :
पुण्यात हडपसरमधील सातव नगर परिसरात स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल एरीयामध्ये भीषण आग लागली आहे.
या भागातील एका कागद पुठ्ठा गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे. या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणावर गोडाऊनमधील सामानाचं नुकसान झालं आहे. अग्निश्मन दलाकडून आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.