रेवदंडा पोलीस ठाणे 'बडी कॉप' कडून उत्कृष्ठ कामगिरी
रेवदंडा पोलीस ठाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातेच्या आरोग्य तपासणी करिता मदत मागितल्याचे कळविल्याने गर्भवती महिला सौ. संगीता भुलाई जैसवाल वय-३० वर्ष, रा.थेरोंडा जेठ्याची वाडी ही ४ महिन्यांची गरोदर असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविका ह्या त्यांना राहत्या घरी आरोग्य सेवा देण्यास वांरवार जात असून गरोदर महिला ही कोणत्याही सेवा घेण्यास नकार देत होती व सदर सेवा घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने सदर महिलेच्या तसेच तिच्या बाळाच्या जिवितास प्रसूती दरम्यान धोका संभवू शकतो तसेच बाळाची योग्य प्रकारे वाढ होण्याकरिता शासकीय मदती पासून वंचित राहीले असते.
सदर गरोदर मातेबाबत मदत मागितल्याने बडीकॉप पेट्रोलिंग दरम्यान महिला पोलीस नाईक/१४७ मोकल व महिला पोलीस नाईक/१६० भोईर ह्या सदर महिलेच्या घरी जाऊन तिला गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी व उपचार न घेतल्यास बाळाला व आईला होणारे धोके याबाबत तिला माहिती समजाऊन सांगून तिचे मन परिवर्तन केल्याने ती उपचार घेण्यास तयार झाली व त्यानंतर आरोग्य विभागाकडून सदर गर्भवती महिलेस योग्य ती आरोग्य सेवा सुरळीत सुरु झाली आहे.