लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास खोपोली पोलिसांकडून अटक, 3,70,000 रुपये किमतीचे 8 लॅपटॉप व इतर साहित्य हस्तगत
रायगड (किशोर केणी) :-
मागील काही दिवसांपासून एक्सप्रेस हावये जवळ असलेल्या फूडमॉल हॉटेल येथे शिवशाही, शिवनेरी व खाजगी टव्हल्स बस मधील प्रवाशी चहा-पाण्याकरिता हॉटेल जवळ थांबेलेले असताना त्या बसमधील प्रवाशांच्या लॅपटॉप व मौल्यवान वस्तूच्या चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढलेले होते. व सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुशंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर व पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांचे नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून रेकॉर्ड वरील आरोपी, गोपनीय माहिती, सी.सी टी.व्ही.कॅमेरे यांचा उपयोग करून हॉटेल फूडमॉल येथे सापळा रचून संशयित इसम अमोल शिवाजी ढोबळे यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये मोबईल, लॅपटॉप, कॅमेरा तसेच इतर वस्तू मिळून आल्या त्यानुसार त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी रायगड व पुणे जिल्ह्यात एक्सप्रेस हायवेवर असलेल्या फूडमॉल हॉटेल च्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडून 8 लॅपटॉप, 1 कॅमेरा, 4 मोबईल व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण अंदाजे 3,70,000/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे प्रवाशांकडून खोपोली पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. सदर कारवाई पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री.धनाजी क्षीरसागर, पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, वसंत शिंदे, प्रदीप खरात, प्रवीण भालेराव, कादर तांबोळी, दत्तात्रय नूलके यांनी मोलाचे योगदान देऊन गुन्हे उघडकीस आणले आहेत.