मुंबईतील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी 

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत. जीएसटी भवनच्या नव्या इमारतीला ही आग लागली आहे.

मुंबई अग्निशमन दलाला लेव्हव 3 चा हा कॉल दिला आहे, त्यामुळे आगीची तीव्रता मोठी असल्याचं कळतंय. धूर येत असल्याचं समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडल्याची माहिती इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. परंतु याबाब अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच इमारतीमधील बहुतांश साहित्य लाकडी असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. इमारतीमध्ये जीएसटीसंदर्भातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आगीमध्ये ती जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. स्पार्किंग झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Popular posts from this blog