एस टी झाडावर आदळून अपघात, ड्रायव्हरसह 10 प्रवासी जखमी
माणगांव (प्रतिनिधी) :-
माणगाव रोहा एसटी बसला अपघात झाल्याने ड्रायव्हर, कंडक्टरसह 7 प्रवासी जखमी झाले आहेत.
रोहा डेपोची एम एच 14/बी टी 1945 एसटी माणगाव वरून दुपारी रोहाकडे येत असताना रोहे तालुक्यातील पाले खुर्द याठिकाणी वळणावर आल्यावर समोरून एक वाहन अंगावर आल्याने एसटी ड्रायव्हर चा अंदाज चुकला आणि त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटले. एसटी समोरील झाडाला जाऊन आदळली. यावेळी एसटीचा टायर रॉड तुटला. परंतु एसटी ड्राइव्हर सूर्यकांत मारुती पारसे याने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
या एस टी मधून अनेक प्रवासी प्रवास करत होते.
अपघातात ड्रायव्हरच्या हातापायाला मार लागला आहे. या अपघातात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
शालिनी मोरे (रा. महादेव वाडी, रोहा), फरिदा कुमेकर (रा. बोर्ली मांडला), राम मालुसरे, पुनम जाधव (रा. धरणाची वाडी, माणगाव), पूजा देशमुख (रा.शेडसई, रोहा), विकी शेडगे (रा. चोरडे, मुरुड), सुमन तिकोने (रा. आंबेवाडी, रोहा) सर्व जखमी प्रवाशांवर रोह्याच्या शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.