भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांचा कुलू-मनाली, अमृतसर अभ्यास दौरा यशस्वी नागोठणे, दि. ११ मार्च (महेंद्र माने) :- येथील भारतीय एजुकेशन सोसायटी विद्या संकुलनातील फार्मसी कॉलेजमधील डिप्लोमा व डिग्रीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संस्थेचे संस्थापक किशोर जैन, सीईओ कार्तिक जैन व कॉलेज प्राचार्य डॉ. आशिष पगारिया यांच्या विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शनाने या वर्षाचा कुलू- मनाली, अमृतसर शैक्षणिक सहल व औद्योगिक भेट हा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला. सदरील नऊ दिवसांचा हा अभ्यास दौरा चंदीगड, कुलू, मनाली आणि अमृतसर येथील औद्योगिक भेट तसेच प्रेक्षणीय व ऐतिहासिक शहरांना भेट देण्यात आली. त्यामध्ये चंदीगड येथील रॉक गार्डन आणि सुकूना तलाव यांना भेट, नेक चंद सैनी यांनी टाकाऊ वस्तूपासून आणि दगडांना विशेष आकार देऊन तयार केलेल्या या उद्यानातील भेट विशेष ठरली. तसेच महाविद्यालयाच्या टैनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे बद्दी येथील यूरोक्रिट लॅब्स इंटरनॅशनल प्रायवेट लिमीटेड या फार्मास्युटिकल कंपनीत औद्योगिक भेटी दरम्यान कंपनीच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना औषध निर्म...