ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

मुंबईत '१३ वी SKYA रॉयल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२६-२७' उत्साहात संपन्न
देशभरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी) :- शोतोकन कराटे यूथ असोसिएशनच्या (SKYA) वतीने आयोजित करण्यात आलेली "१३ वी SKYA रॉयल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२६-२७" ही भव्य स्पर्धा नुकतीच गोरेगाव (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर असलेल्या आय. बी. पटेल म्युनिसिपल स्कूलच्या प्रांगणात अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडली. या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेला अधिकृत सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री. पंकज पिंपळे, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कांदिवलीचे अध्यक्ष श्री. प्रशांत मिश्रा, तसेच दहिसर पूर्व येथील भरुचा रोड एम.पी.एस. हिंदी शाळेचे माजी प्रधानाध्यापक माननीय श्री. अशोककुमार राममूर्ति सिंह यांनी उपस्थित राहून सर्व स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

​या महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन शोतोकन कराटे यूथ असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष हंशी राजू गौरू मोरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले होते, तर स्पर्धेच्या भव्य आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी त्यांचे मार्गदर्शक गुरु शिहान संजय गव्हाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रवेळी क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी स्पर्धेला भेट दिली, ज्यामध्ये VSKF India/AKF JB चे अध्यक्ष व संचालक शिहान वीर चौहान, तसेच KIO च्या स्पर्धा आयोगाचे सदस्य आणि भारत शाखेचे अध्यक्ष व संचालक हंशी बिजू नायर यांच्या विशेष उपस्थितीमुळे या चॅम्पियनशिपचा दर्जा व प्रतिष्ठा अधिकच उंचावली.

​या राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये नागपूर, औरंगाबाद, जालना, गुजरात, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, सांगली यांसह देशातील विविध राज्यांतून आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या शेकडो कराटेपटूंनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान सर्वच वयोगटातील खेळाडूंनी कमालीचे तंत्रज्ञान, उत्कृष्ट आत्मसंरक्षण कौशल्य, कडक शिस्त आणि उच्च दर्जाच्या क्रीडाभावनेचे प्रदर्शन घडवून उपस्थित क्रीडाप्रेमी व प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आयोजकांनी या उपक्रमात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक प्रशिक्षक, परीक्षक व पंच, स्वयंसेवक, पाठींबा देणारे पालक आणि सहभागी झालेल्या सर्व संघांचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही '१३ वी SKYA रॉयल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप' कराटे क्षेत्राच्या इतिहासात एक अत्यंत संस्मरणीय, ऐतिहासिक आणि यशस्वी पर्व म्हणून नोंदवली गेली आहे.

Comments

Popular posts from this blog