ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

नागोठणे-शिहू रस्त्यावर टेम्पो आणि मोटरसायकलचा भीषण अपघात!

 एकाचा मृत्यू, तर एक जखमी 

नागोठणे-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- ​नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. वेलशेत गावच्या हद्दीत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील नागोठणे ते शिहू रस्त्यावर हा अपघात झाला. मूळचे रोहा येथील कावेची वाडी, पोस्ट शेणवई येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या शाईन मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच ०५ बीबी ८४९५) त्यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीला पाठीमागे बसवून नागोठणे बाजूकडून शिहूच्या दिशेने चालले होते. ते वेलशेत गावच्या जलशुद्धीकरण केंद्रासमोर आले असता, शिहू बाजूकडून नागोठणे बाजूकडे अत्यंत भरधाव वेगाने आणि हलगर्जीपणाने येणाऱ्या एका टेम्पोने (क्रमांक एमएच ०६ सीपी ०७२७) त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मोटरसायकलचालक गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशास लहान-मोठ्या स्वरूपाच्या गंभीर दुखापती झाल्या आहेत. 

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिहू, पोस्ट बेणसे येथील रहिवासी असलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(२), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पावरा हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog