ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

​नागोठण्यात लायन्स क्लबच्या वतीने १७ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

नागोठणे (महेंद्र माने) :- येथील लायन्स क्लबच्या वतीने आयोजित शैक्षणिक उपक्रमांतर्गत १७ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, २८ जून रोजी क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात परिसरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सेक्रेटरी डॉ. अनिल गीते यांनी, लायन्स क्लब गेली १७ वर्षे हा उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या यशाचे कौतुक करणे हेच यामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सोहळ्यात मार्गदर्शन करताना विलास चौलकर आणि विवेक सुभेकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक मूल्ये जोपासण्याचा मौल्यवान संदेश दिला.

​अध्यक्ष विलास चौलकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मावळते अध्यक्ष सखाराम ताडकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी चार्टर प्रेसिडेंट प्रकाश जैन, सुधाकर जवके आणि यशवंत चित्रे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणारा आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरक ठरणारा हा उपक्रम पुढेही असाच उत्साहाने सुरू ठेवण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशासाठी संतोष शहासने, विजय शहासने, अनुराधा शहासने, विवेक करडे, सुनील कुथे, ॲड. स्मिता कुथे, सिद्धेश काळे, दीपक लोणारी, ॲड. महेंद्र धामणे, विनोद दुबे, रतन हेंडे आणि विशाल शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. अंकिता पाटील व जान्हवी आगाशे यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत संपूर्ण सोहळा अधिक आकर्षक आणि शिस्तबद्ध केला. या सोहळ्याला क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानल्यानंतर 'वंदे मातरम'ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog