ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

पावसाचा जोर कायम; नागोठणे शहारात पुराचे पाणी!

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलाडली
एसटी स्थानकात पाणी; वाहतूक महामार्गावरून वळवली

 प्रवाशांचे हाल, व्यापारी चिंतेत 

नागोठणे-रायगड, दि. ५ (महेंद्र माने) :- अंबा नदीने रविववार ५ जुलै रोजी दुपारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणी येणारे तिन्ही रस्ते बंद झाल्याने तसेच एसटी स्थानकात पुराचे पाणी भरल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील लहान मोठ्या  दुकानदारांची धावपळ होऊन ताळांबळ उडाली आहे.

गेले काही दिवस सतत पडणारा पावसाबरोबरच शनिवारी दिवस रात्र शहरासह डोंगर माथ्यावर पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अंबा नदीत वाढल्याने रवीवार 5 जुलै रोजी दुपारच्या सुमारास अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली व पुराचे पाणी एस.टी. स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ, मरिआई मंदिर समोरील परिसर, कोळी वाडा, मोहल्ला मटण मार्केट, हॉटेल लॅकव्हयू व सरकारी विश्राम गृहाचा परीसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे एस.टी. स्थानका शेजारील व शिवाजीचौकातील छोटे छोटे टपरीमधील व इतर दुकानदारांनी आपल्या दुकांनातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. तसेच नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाल्याने असून एस.टी. स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा देण्यात आला. एसटी बसने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी स्थानकात तसेच महामार्गाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी मंदिर, बाळासाहेब ठाकरे नगर मार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

बाजार पेठेत शिरलेले पुराचे पाणी वाढले तर आपल्या दुकानात पाणी शिरेल या चिंतेत येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ, मोहल्ला, कोळीवाडयासह इतर ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी दुपारी  1.00 नंतर वाढत जात असल्याने व्यापार्‍यांसह नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी कमी झाले तर त्यांच्या मधील चिंता थोड्या फार प्रमाणात कमी  होईल. तसेच,  पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी निश्चित वाढणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले होता. पुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला.

Comments

Popular posts from this blog