ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

१९ रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे रवाना

प्रत्येक माणसाला आनंदी राहण्यासाठी डोळ्यांची महत्वाची भूमिका - विलास चौलकर

नागोठणे (महेंद्र माने) :- नागोठणे येथील बाळासाहेब ठाकरे नगर मधील लायन्स क्लबच्या सभागृहात नागोठणे लायन्स   क्लब आयोजित नजमूद्दीन व्होरा व आर. झुनझुनवाला शंकरा आय रुग्णालय न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १ जुलै रोजी क्लब अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली क्लबचे यशवंत चित्रे, विवेक सुभेकर, प्रकाश जैन, डॉ.अनिल गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाला. यावेळी प्रत्येक माणसाला आनंदी राहण्यासाठी डोळे महत्वाची भूमिका करत असल्याचे प्रतिपादन विलास चौलकर यांनी केले. या शिबिराचा ५६ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यापैकी १९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन पनवेल येथे पाठविण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास चौलकर यांनी सांगितले की, माझ्या अध्यक्षीय कारकीर्तीमधला हा पहिलाच कार्यक्रम असून माझ्या क्लब कडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्य गरजेचे असून पुढील सर्व कार्यक्रम आपण यशस्वी करू यात. तसेच प्रत्येक माणसाला आनंदी राहण्याचा आधिकार असून त्यासाठी आपले अवयव व्यवस्थित असले पाहिजेत. यामध्ये डोळे हे महत्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठीचा हा मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर असून हे कार्य नागोठणे लायन्स क्लब आर. झुनझुनवाला शंकरा आय रुग्णालय यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडीत असल्याचे सांगून सर्व रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे उपचार घेण्याचा सल्ला शेवटी विलास चौलकर यांनी दिला. सदरील शिबिराचा ५६ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यापैकी 19 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन पनवेल येथे पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विवेक सुभेकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी क्लबचे सखाराम ताडकर, सुनील कुथे, दीपक गायकवाड, विजय शहासने, विशाल शिंदे, दीपिका गायकवाड, अनुराधा शहासने यांच्यासह नजमूद्दीन व्होरा, सुमित चौलकर, शंकरा आय. रुग्णालयचे डॉ. समृद्धी जंगम व विजय बामणे तसेच क्लब पदाधिकारी सदस्य, रुग्ण व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog