खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप
सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांमधे अधिक क्षमता असते - ना. आदिती तटकरे
लोणेरे-माणगांव, दि. १२ (राम भोस्तेकर) :- आधुनिक शिक्षण आधुनिक भारताच्या विकासाचा पाया आहे. सर्वांना शिक्षण मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. यासाठी राज्यशासन आणि केंद्र सरकार सदैव प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी माणगाव तालुक्यातील गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी विद्यामंदिर जावळी म्हणजेच जावळी हायस्कूल मध्ये ११ जुलै रोजी रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू समिती चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य महिला बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, संस्था संचालक शांताराम भोरावकर (गुरुजी). रा. काँ. मा. ता. अध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, जि. प. सदस्य अस्लम राऊत, पंचायत समिती उप सभापती मनिषा मालोरे, संगिता बक्कम, माजी सभापती व विद्यमान सदस्या अलका केकाणे, भुवन ग्रामपंचायत सरपंच दिपक जाधव, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, होडगाव सरपंच बळीराम खाडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शादाब गैबी,मुख्याध्यापिका नेहा केकाणे, माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, महेश महाजन, उपस्थित होते व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करताना ना आदिती तटकरे यांनी गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यप्रणालीवर स्तुतीसुमने उधळली आणि म्हणाल्या की या संस्थेचे कार्य उत्तमरित्या आणि शिक्षणाच्या विकासाच्या बाजूने सुरू आहे. ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. आणि या संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना पूरक तसेच इतर सामाजिक उपक्रम घेण्याचा योग या ठिकाणी आला त्यावेळी देखील या संस्थेचे भरीव सहकार्य लाभले. सधन म्हणजे ज्यांचे कुटुंब सधन म्हणजे श्रीमंत कुटुंब आहे त्यांच्या मुलांनी प्रगती करणे ठीक आहे पण त्यापेक्षा अधिक कार्यक्षमता ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असते हे प्रमुख उद्गार या कार्यक्रमाच्या वेळी ना. आदिती तटकरे यांनी प्रामुख्याने काढले. या कार्यक्रमात ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणपयोगी साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के यांनी केले.


Comments
Post a Comment