ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

नागोठणे नगरीत शिवसेनेकडून टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांचा निषेध

नागोठणे-रायगड, दि. २९ (महेंद्र माने) :- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागोठणे विभागीय शाखेच्या वतीने रविवार, २८ जून रोजी सकाळी टीईटी पेपरफुटीप्रकरणी जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रोहा उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत आणि शाखाप्रमुख राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या तीव्र निषेध केला, तसेच त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली.

​सर्व शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले आणि त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'शिवसेना जिंदाबाद', 'भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो', 'शिक्षण मंत्री राजीनामा द्या', 'उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है', आणि 'हा आवाज कुणाचा... शिवसेनेचा' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ पद सोडण्याची मागणी केली. या प्रसंगी शहर संपर्कप्रमुख मुकेश भोय, शहर संघटक बाळू रटाटे, उपशाखा प्रमुख पंकज कामथे यांच्यासह लहू तेलंगे, अंजली दुर्गावले, संजय पिंपळे, सुहेल पानसरे, चेतन कामथे, कैलास गोरे, संजय पाटील, श्रीराम मांगले, नागेश सुर्वे, सुभाष बामणे, रुपेश जगताप, मनोज कोळी, सलीम अख्तर, विठ्ठल इंदुलकर, तेजस मिनमिणे, शशिकांत देवळे, राकेश भिसे, आदेश जवके तसेच नागोठणे विभागातील अनेक शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog