ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

उत्तर मुंबई महिला काँग्रेसच्या महासचिव पदी पूनम शिंदे यांची नियुक्ती
पक्षाकडून संघटनात्मक जबाबदाऱ्या जाहीर

बोरीवली-​मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) :- संभाजी ब्रिगेडच्या उत्तर मुंबई जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूनम शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील राजीव गांधी भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या बैठकीला मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. तुलीप मिरांडा आणि उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रगती राणे प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांच्याच उपस्थितीत पूनम शिंदे यांच्यासह नंदा तळवटकर, गायत्री टपाल, सुरेखा अलमवार, सुरेखा सब्बन यांच्यासह सुमारे १५ हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. या सर्व महिलांचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली.

​या जाहीर पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी तातडीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक जबाबदाऱ्याही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पूनम शिंदे यांची उत्तर मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे उत्तर मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूनम शिंदे यांच्यासोबतच आलेल्या इतर महिला सहकाऱ्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नंदा तळवटकर यांची प्रभाग क्रमांक १४ च्या अध्यक्ष पदावर, सुरेखा अलमवार यांची प्रभाग १४ च्या सचिव पदावर, तर गायत्री टपाल यांची प्रभाग १४ च्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या पदांचा वापर करून आगामी काळात काँग्रेस पक्षाचे संघटन तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आणि पक्षाचे काम अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Comments

Popular posts from this blog