ब्रेकिंग न्यूज
🚨 बुधवार, दि. १ एप्रिल रोजी रोहा तालुक्यातील भातसईच्या श्री महादेवी मातेचा वार्षिक यात्रोत्सव; 'गळ लावणे' विधी यात्रेचे मुख्य आकर्षण... 🚨 रोह्यातील श्री धावीर मंदिर मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला; नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या शिष्टाईला यश... 🚨

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा - महेंद्रशेठ घरत

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे दिघोडे हायस्कूलला २५ लाखांची देणगी

उरण (विठ्ठल ममताबादे) :- "माझे शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण आहे की, आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला द्या, मी आज तेच करतोय. खरोखर गरजवंत आहेत त्यांना मदतीचा हात कायम देत आलो आहे. शैक्षणिक कार्य, वारकरी, मंदिरांसाठी मदत करताना मी मागेपुढे पाहत नाही. सढळ हाताने देणगी देतो. त्यामुळे दिघोडे येथील ग्रामीण भागातील हायस्कूलसाठी २५ लाख रुपये देणार! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सुविधा मिळणे आणि शिक्षण संकुल, ही काळाची गरज आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, विशेषतः जे पदाधिकारी आहेत, त्यांची दिघोडे हायस्कूलसाठी मदत करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मी पहिल्यांदाच दिघोडे हायस्कूलमध्ये आलो आहे. त्याचा विचार करून मी हायस्कूलसाठी कुठलेही आढेवेढे न घेता मदत जाहीर करीत आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत दिघोडे येथे म्हणाले. महात्मा गांधी विद्यालय व  दिवंगत रामदास ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय दिघोडे यांच्या वतीने दिवंगत रामदास ठाकूर यांचा २६ वा स्मृतिदिन हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत बोलत होते. 

यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, सरपंच सुचिता ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, महेश कातकरी, संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, नारायण पाटील, गणेश पाटील, अविनाश पाटील, दीपक मढवी, चंद्रभागा पाटील, उज्वला थळी, परमानंद पाटील, ज्ञानप्रकाश पाटील, प्राचार्य संजय फल्ले आणि दिघोडे विभागीय शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog