ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

श्री राधाकृष्ण, साईबाबा, गणपती मंदिरात श्री साईबाबा उत्सव धार्मिक वातावरणात संपन्न

नागोठणे (महेंद्र माने) :- नागोठणे येथील गवळ आळीमधील श्री राधाकृष्ण, साईबाबा, गणपती मंदिरात शिवसह्याद्री मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ गवळआळी, यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षीही मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रामनवमी निमित्त श्री साईबाबा उत्सव मोठ्या धार्मिक वायतावरणात संपन्न झाला.    
या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00  वाजता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विलास चौलकर व सौ. श्वेता चौलकर या दापत्यांच्या हस्ते श्री साईबाबा यांच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक, सकाळी 8.00  वाजता श्री व सौ. समिधा सुदाम घाग यांच्या हस्ते ध्वज पुजन, सकाळी 10.00 श्री व सौ. स्नेहा सुभाष काटले, श्री व सौ. पुष्पा शिवाजी नेरपगार, श्री व सौ. ज्योती संदीप राऊत यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा, सायं. 3.00 ते 05.00 वा. आरकेएस ग्रामस्थ महिला मंडळ, गवळ आळी यांचे हळदी कुंकू, 5.30 ते 6.30 वाजता हरिपाठ, 07.00 ते 09.00 वा. ह.भ.प. हरिष महाराज दिघीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाची सांगता रात्री 10.00 वा गोवर्धन पोलसानी यांच्या सौजन्याने महाप्रसाद तसेच आभार प्रदर्शनाने करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ नागोठणे शहरासह विभागातील भाविकांनी घेतला असून कार्यक्रम यशस्वी करण्या करिता विश्वस्त मंदिर ट्रस्ट विलास चौलकर, सेक्रेटरी सुदाम घाग, उपाध्यक्ष गणेश घाग,खजिनदार दिनेश घाग,सेक्रेटरी प्रभाकर पाटील, सहसेक्रेटरी विजय चौलकर, कार्याध्यक्ष – प्रसाद जोगत,रविंद्र वाजे व संतोष पाटील यांच्यासह गवळ आळी ग्रामस्थ व महिला मंडळ व सर्व पदाधिकारी-सदस्य यांनी अपार मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog