ब्रेकिंग न्यूज
🚨 लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई 🚨

आदगांव येथे अदानी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिर

आदगांव-श्रीवर्धन, दि. २६ (राहुल गोरीवले) :- अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या वतीने ग्रामपंचायत आदगांव येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अलिबाग येथील त्वचारोग तज्ञ, महिला रोग तज्ञ व जनरल फिजिशियन यांनी ग्रामस्थांना तपासणी करून मोफत औषधोपचार दिले. समुद्रकिनारी राहणाऱ्यांमध्ये आढळणाऱ्या त्वचेच्या आजारांवर तसेच वृद्धांच्या सांधेदुखी, गुडघेदुखीवर व इतर अनेक प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात आले.
या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त लाभ घेतला. शिबिरासाठी सरपंच सौ.यमुना जाधव, उपसरपंच श्री. संदीप गोरीवले व ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रवीण राऊत, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, अशासेविका यांचे सहकार्य लाभले.
गावचे उपसरपंच श्री. संदीप गोरीवले यांनी ग्रामीण भागात असे सी. एस. आर. अंतर्गत उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेला आवश्यक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अदानी फाउंडेशनचे श्री. अवधूत पाटील यांनी, “गावकऱ्यांनी आरोग्यविषयक या सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ करून घ्याव्यात. अशा उपक्रमांचा लाभ भविष्यातही सातत्याने मिळत राहील,” असे सांगितले.
शिबिराच्या यशासाठी ग्रामसखी  प्राजक्ता आडुळकर व यांनी परिश्रम घेतले.


Comments