ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

घरातून २० तोळे सोने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीचा सलग सात दिवस चार राज्यांमध्ये पाठलाग करून शीताफिने अटक

चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत; सर जे. जे. मार्ग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

मुंबई वृत्त (रणजीत मस्के) :- नागपाडा - मुंबई येथील आफिया हाईट्स येथे राहणारे युसुफ इब्राहिम कसमणी यांच्या राहत्या घरातील इंटीरीयरचे काम चालू असताना त्यांचे घरातील सर्व दरवाजे उघडे होते. त्या दरम्यान त्यांचे बेडरुमच्या लाकडी कपाटात ठेवलेले २०० ग्रॅम वजनाचे अंदाजे २४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे बार  फिर्यादी यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पो उप नि प्रशांत नेरकर व पथक हे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये फिर्यादीकडे कामाला आलेला एक इसम हा संशईतरित्या जाताना दिसून आल्याने त्याची माहिती घेतली असता त्यांचा मोबाईल नंबर बंद मिळून आला व त्याचे आधार कार्ड बनावट असल्याचे समजलेने त्याचे राहते परिसरात जाऊन शोध घेतला असता सदर इसमाने त्याचे रूम मधील सर्व सामान विकून तो गावी पळून गेल्याची माहिती मिळवून आली.

याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तांत्रिक माहिती आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व पथक हे तात्काळ जिल्हा बांदा, यू. पी. येथे रवाना झाले व आरोपी इसमाच्या गावात जाऊन गुप्त बातमीदार यांच्यामार्फत चौकशी केली असता आरोपी इसम तेथे आला नसल्याबाबत माहिती मिळून आली. आरोपी इसम हा सराईत आरोपी असल्याने त्याने मोबाईल चालू केला नाही व त्याचे राहण्याचे ठिकाण देखील सतत बदलत असल्याने पथकाने सलग ७ दिवस ४ राज्यांमध्ये त्याचा पाठलाग करून  दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती आधारे मतोंध - कानपूर हायवेवर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी जात असलेल्या खाजगी बस ला थांबविली असता आरोपी इसमाने बसच्या खिडकीमधून उडी मारून झाडाझुडपात पळून जात असताना त्यास शीताफिने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. इर्शाद कल्लू खान, वय २२ वर्षे, रा. मंडला, मानखुर्द, मुंबई. मूळ राहणार - गाव गोयरा मुगली,  ठाणा मतोंध, जिल्हा - बांदा, राज्य- यू. पी. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मुंबई, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,  डोंगरी विभाग, मुंबई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पो. ह. तडवी, पो. शि. घाडगे, पो. शि. कोलपुसे, पो. शि. शेवरे, पो. शि. डावरे, पो. शि. चौधरी यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Comments

Popular posts from this blog