🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
आंतरराष्ट्रीय युवा दिन, सदभावना दिनानिमित्त बाईक रॅली कार्यक्रम संपन्न


रायगड (प्रतिनिधी) :- आंतरराष्ट्रीय युवा दिन  12 ऑगस्ट व  20 ऑगस्ट  सदभावना दिन या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून युवकांमध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग  व   मेरा युवा भारत,अलिबाग-रायगड  यांच्या संयुक्त विद्यमाने  अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित बाईक रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. 
अलिबाग समुद्र किनारा येथून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बाईक रॅली मार्गस्थ करण्यात आले. यावेळी  निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण कंदाडे  तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, मेरा युवा भारत, अलिबाग- रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे,तपस्विनी गोंधळी, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू,स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग आदी  उपस्थित होते. 
यावेळी  वचन पाळा, एड्स टाळा, स्त्री शक्तीचा एकच नारा एचआयव्ही/एड्स हद्दपार करा, होऊ या एकसंघ करूया एचआयव्हीचा प्रतिबंध इत्यादी विविध घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती  करण्यात आली.  ही बाईक रॅली अलिबाग समुद्रकिनारा कमानी येथून सुरू होऊन पुढे महावीर चौक– छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बालाजी नका - मारूती नाका रोड  - समुद्रकिनारा  येथे या रॅलीची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन, स्वागत व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग संजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog