१७७ कोटी रुपये खर्चाचा अलिबाग रोहा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद
रक्षाबंधन सणाच्या दिवशी प्रवाशांना बसला फटका; लाडक्या बहिणी संतापल्या
राज्य महामार्ग म्हणून ओळख असलेल्या अलिबाग रोहा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी चार वर्षांपूर्वी 177 कोटी रुपये निधी मंजूर झाला. हॅम (हायब्रीड ॲन्युटी मॉडेल) अंतर्गत रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून अलिबाग-रोहा मार्गावरील दोन पूल वाहतुकीच्या दृष्टीने कमकुवत व धोकादायक झाल्याने या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गाचे वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
ऐन सणासुदीत गरिबांची लाल परी एसटी ची वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्याने प्रवाशी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी रक्षाबंधन हा सणाच्या दिवस लक्षात घेऊन रोहा अलिबाग करिता पर्यायी असलेल्या रेवदंडा मार्गावरील एसटी फेऱ्या वाढविणे गरजेचे होते, परंतु तसे काहीही नियोजन रोहा आगाराने न केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

Comments
Post a Comment