ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
बदनामीची भिती दाखवून वारंवार धमकी व पैशांची मागणी; वारंवार पोलीसांशी संपर्क साधूनही कारवाई नाही
१५ ऑगस्ट रोजी मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा ईशारा


रत्नागिरी (प्रतिनिधी) :- बदनामीची भिती दाखवून वारंवार धमकी व पैशांची मागणी करणाऱ्यांविरूद्ध वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने शेनाळे, ता. मंडणगड येथील विजय सिताराम काते व अन्य एका महिला येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई मंत्रालयासमोर उपोषणास बसणार असून तशा प्रकारची सूचना लेखी अर्जाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त मुंबई, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी, यांच्यासह संबंधित शासकीय कार्यालयांना देण्यात आली आहे.
ब्लॅकमेल करून खंडणी घेऊन उलट पैशांच्या मागणीसाठी वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी, तसेच "मेन पोलीस सूट फोटो एडिटर" ह्या गुगल प्ले स्टोअर वरील पोलीस फोटो एडिटर ॲप मधून मंडणगड येथील व्यावसायिक विजय काते यांच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून "खाकी ड्रेस घालून तोतया वनअधिकारी" अशा स्वरूपाच्या खोट्या बातम्या न्यूज पोर्टलमध्ये पब्लिश झाल्या होत्या आणि त्या बातम्या समीर बामुगडे याच्या मोबाईल क्रमांकावरून अनेक व्हाट्स अप ग्रुपवर फॉरवर्ड झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
तसेच त्या खोट्या बातम्या थांबविण्यासाठी त्याने वारंवार पैशाची मागणी करून गुगल पे वर पैसे घेतलेले आहेत. "सदरच्या बातम्या मी दापोली येथील विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून पब्लिश केलेल्या असून त्या बातम्या धादांत खोट्या आहेत." असा स्पष्ट लेखी जबाब समीर बामुगडे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दिलेला आहे. तसेच, यासंदर्भात त्याने व्हिडीयो प्रतिक्रीया देखील दिलेली आहे. त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यातील व्यावसायिक विजय काते यांच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून त्या फोटोसह खोट्या बातम्या छापून बदनामी केली आणि पैसे मागितले. पैसे देणे बंद केले तर फोटो मिक्सींग करून ते व्हायरल करून बदनामी करीन, अशी वारंवार धमकी देऊन समीर बामुगडे याने पैसे घेतलेले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे फोटो मिक्सींग करून कुणाचीही बदनामी सहज करता येते. याचाच फायदा समीर बामुगडे याने घेऊन विजय काते यांच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून तो व्हायरल करून वारंवार बदनामी केलेली असून सदरची बदनामी थांबविण्यासाठी वारंवार पैशाची मागणी व धमकी देण्यात आल्याने विजय काते यांनी याप्रकरणी अनेक वेळा पोलीसांशी संपर्क साधला होता. परंतु पोलीसांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करून न घेतल्याने अखेर विजय सिताराम काते व या विषयाशी संबंधित असलेल्या अन्य एका महिलेने याप्रकरणी कारवाई न झाल्यास थेट मंत्रालयासमोरच आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, आता तरी गुन्हेगारांवर कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न मंडणगड येथील व्यावसायिक विजय काते यांनी उपस्थित केला आहे.

Comments

Popular posts from this blog