🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

वेळास समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू

श्रीवर्धन (प्रणय कीर) :- श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील (रा. गोंडघर) यांची दोन मुले अवधूत पाटील (वय-२६) आणि मयुरेश पाटील (वय-२३) आणि त्यांचा मित्र हिमांशू पाटील (वय-२१, रा. ऐरोली, नवी मुंबई) हे तिघेजण श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी समुद्रात पोहण्यासाठी गेले असता तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. त्यावेळी स्थानिक तरूण आणि वॉटरस्पोर्ट चालकांच्या मदतीने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे पाटील कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog