जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या खेळाडूंचे घवघवीत यश! 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन'च्या विद्यार्थ्यांची पदकांवर मोहोर शालेय बॉक्सिंग मैदानात पेणचा दरारा पेण-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पेण शाखेमध्ये शिहान विनायक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट तंत्र आणि कौशल्याचे प्रदर्शन करत तालुक्याच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. पिल्लई एचओसी स्कूल, रसायनी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील (अंडर-१४) वयोगटातील ३० ते ३२ किलो वजनी गटामध्ये सार्वजनिक विद्यामंदिर पेणचा खेळाडू सुफियान मिन्हाज अन्सारी याने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत मानाचे रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) पटकावले. तसेच १९ वर्षांखालील (अंडर-१९) वयोगटातील ७५ ते ८१ किलो या वजनदार गटात 'न्यू...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
फिर्यादीनेच रचला घरफोडीचा बनाव ६ लाख ६० हजारांचे दागिने लंपास करणाऱ्या तक्रारदाराला रायगड पोलिसांकडून बेड्या घरचाच कारटा निघाला चोरटा! नागोठणे-रायगड, दि. २१ (महेंद्र माने) :- आर्थिक अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी चक्क स्वतःच्याच घरात चोरी करून कुटुंबीयांची दिशाभूल करणाऱ्या आणि पोलिसांत घरफोडीची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या एका भामट्या फिर्यादीचे बिंग फोडण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. पेण तालुक्यातील आंबेराई-बेणसे येथील या संशयित तक्रारदाराने सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वतःच लपवून ठेवत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा बनाव रचला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि नागोठणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही वेळातच या प्रकरणाचा छडा लावून फिर्यादी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दीपक रामचंद्र भुरे (रा. आंबेराई, पो. बेणसे, ता. पेण) याने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्य...

Comments
Post a Comment