🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

श्री रघुनाथ कडू, श्री पांडूरंग कडू व श्री ज्ञानेश्वर कोळी यांची ग्रामपंचायत समितीवर बिनविरोध अध्यक्ष पदी निवड

रोहा (किरण मोरे) :- रोहा तालुक्यातील शेडसई ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दुसऱ्यांदा तंटामुक्त समितीवर श्री रघुनाथ कडू व श्री ज्ञानेश्वर धर्माजी कोळी यांची सुद्धा दुसऱ्यांदा पाणलोट समिवर तर वन कमेटीवर श्री पांडूरंगशेट महादू कडू यांची प्रथमता अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

शेडसई ग्रृप ग्राम पंचायतीची १६ ऑगस्ट २०२४ रोजी कोहरम अभावी तहकूब ग्रामसभा झाली होती. ती ग्रामसभा गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी शेडसई येथील हनुमान मंदीराच्या सभामंडपात ठिक १२:३० वाजता घेण्यात आली असता अजंठ्यावरील विषयावर तंटामुक्त अध्यक्ष, पाणलोट कमेटी आणि वनकमेटी नव्याने निवडीचा विषय घेतला असता पुन्हा एकदा सर्वांमते एकमुखाने बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री रघुनाथ गणपत कडू व श्री पांडुरंग कडू, रा. गोफण, तर श्री ज्ञानेश्वर कोळी रा. भागिर्थीखार येथील रहिवासी असून यांचे नाव घेतले व पुन्हा एकदा त्यांना नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली.

यावेळी सरपंच सौ.कल्याणी कृष्णा मढवी, उपसरपंच सौ. राजेश्री राजन पाटील, सदस्या सौ. प्रिया दिनेश कडू, सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू, श्रीमती जनाबाई पवार, मिनाक्षी देवचंन म्हात्रे, सदस्य श्री तानाजी देवजी म्हात्रे, ग्रामसेविका सौ. नागोटणेकर, ग्रामरोजगार सेवक श्री विलास सिताराम म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते देवचंन धर्मा म्हात्रे, सिताराम महादू म्हात्रे, चंद्रकांत पांडुरंग भोई, मारुती नारायण वाघमारे, दिनेश कडू, कृष्णा मढवी, मारुती महादू भोई, मोहन गायकर, रोहन कडू यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगीनी उपस्थित होते.

ग्रामसभेच्या अजंठ्यावरील विषय सविस्तर घेण्यात आले. तर काही अर्जांवर चर्चा करून निकाली काढण्यात आले. तसेच नव्या जुन्या कामांना ठराव मंजुरी देण्यात यावेत असे सर्वानुमते ठरले असून त्यांची प्रोसिडींगमध्ये नोंद घेण्यात आली.

सभेतील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात घेऊन योग्य पद्धतीने ग्रामसभेचे कामकाज संपन्न झाले. यावेळी ग्रामसेविका सौ. नागोटणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले नंतर 

नवनिर्वाचित अध्यक्षांचे यथोचित हस्तांदोलन करून सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog