ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

बौद्धजन पंचायत समिती इंदापूर शाखा क्र. ४ च्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन

माणगाव (उत्तम तांबे) :- बौद्धजन पंचायत समिती माणगांव तालुका यांच्या आदेशाप्रमाणे इंदापूर विभाग २६ गाव ग्रुप शाखा क्र. ४ च्या वतीने सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सहावे पुष्पाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  श्रावण पौर्णिमा निमित्त बौध्द धम्माचे मंगलदिन या विषयावर धम्म प्रवचनकार अशोक कासारे गुरूजी, मुंबई  यांनी अतिशय मंगलवाणीतुन उपस्थित उपासकांना प्रबोधन दिले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास व त्यातील मंगल दिन तसेच तथागत गौतम बुद्धांनी उपदेश केलेल्या धम्मातील मंगल दिनाचे महत्त्व पटवून देताना कासारे गुरुजी पुढे म्हणाले की, आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा यामध्ये जेवढ्या पौर्णिमा येतात ते बौद्ध धम्माचे मंगल दिन आहेत. या धम्मदिनाच्या वर्षावास कार्यक्रमातून उपासकांनी धम्माचे आचरण व पालन केले तर समाजात उत्तम परिवर्तन होईल ही धम्माची चळवळ जागृत ठेवली तर धमक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रबोधनकार अशोक कासारे गुरुजी यांनी व्यक्त केला. 

सदर वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माणगांव बौद्धजन पंचायत समिती तालका अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी स्विकारले होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माणगांव तालुका बौध्दजन पंचायत समितीचे चिटणीस रघुनाथ साळवी, रजित मोहिते, उत्तम तांबे, निलेश साळवी, विनोद मोरे, आमोल मोहिते, रामदास मोरे, पराग जाधव, अरविंद मोरे यांची उपस्थिती होती. तसेच या मंगल कार्यक्रमाला मधूकर सकपाळ, मोतिराम शिर्के, लक्ष्मण गवाणे, राजेश सकपाळ, सयाजी मोरे, शुक्रदास मोरे, गोविंद जाधव,संतोष मोरे, नंद साळवी, किरण मोरे, प्रकाश कासे, राहुल गवाणे, दिपक गायकवाड,सुरेश शिर्के, संतोष म्हस्के, जितेद्र राव, राजेद्र राव अ‍ॅड. मनोज गायकवाड, मनोहर जाधव, गोविंद म्हसके, रमेश घोगरे तसेच उपासिका - उपासक बहुसंखेने उपस्थित होते. यावेळी सकाळी १०.०० वाजता कार्याध्यक्ष लक्ष्मण गवाळे यांच्या शुभहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. १०.३० वा धम्म पुजा पाठ, ११.०० वा उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. तसेच या धम्म वर्षावास मिलिका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव बौ. पं. समिती शाखा क्र. ४ मुकेश सकपाळ यांनी केले होते. तसेच प्रस्ताविक महेंद्र गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. राकेश मोरे यानी केले.

Comments

Popular posts from this blog