ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नागोठणेकरांचे मैत्रीचे नाते, दिलेले प्रेम व ठेवलेला विश्वास विसरणार नाही – पोलीस निरीक्षक हरिष काळसेकर


नागोठणे (महेंद्र माने) :- येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष काळसेकर यांची पोलीस निरिक्षक पदोन्नती होऊन नागपूर शहर येथे बदली झाली. त्या निमित्ताने रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे, कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, सामाजिक कार्यकर्ते नाजीम नालखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार 17 जुन रोजी पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या छोटेखानी निरोप समारंभात विभागासह नागोठणेकरांचे मैत्रीचे नाते त्यांनी दिलेले प्रेम व माझ्यावर ठेवलेला विश्वास विसरणार नसल्याचे भावनिक उद्गार पोलीस निरीक्षक हरिष काळसेकर यांनी काढले. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम, गुन्हे शाखेचे पो. ह. विनोद पाटील, मारुती देवरे, किशोर म्हात्रे, दर्शना जवके, श्रेया कुंटे, आनंद लाड, सचिन मोदी, सिराज पानसरे, ग्रा.पं. सदस्या शहनाज अधिकारी व शबाना मुल्ला यांच्यासह अपर्णा सुटे,सुजाता जवके, निलोफर पानसरे, संगीता पोलसानी, असिफ मुल्ला, प्रविण ताडकर, साईनाथ धुळे, राजेश पिंपळे, चेतन कामथे, हुसेन पठाण आदींसह पोलीस कर्मचारी, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या निरोप समारंभाला उत्तर देताना हरेश काळसेकर यांनी सांगितले की, या विभागात काम करीत असताना जे चांगले काम माझ्या सर्व सहकार्‍यांमुळे झाले असून ज्या मध्ये अपयश आले ते माझे आहे. मी प्रत्येक कामाचे परिपक्व अभ्यास करुन कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत असतो. मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा असल्याने मला सर्वांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे या विभाग व नागोठणेकरांचे मैत्रीचे नाते निर्माण झाले असून त्यांनी दिलेले प्रेम व माझ्यावर ठेवलेला विश्वास कदापी विसरणार नाही.त्यांना माझे पूर्ण सहकार्य कायम राहणार असून यापुढे केव्हाही मला रायगड जिल्ह्यात काम करायला मिळाले तर निश्चितच आवडणार असल्याचे सांगून नागोठणेकरांबरोबरचे प्रेम व संपर्क नेहमीच राहणार असल्याचा विश्वास शेवटी काळसेकर यांनी व्यक्त केला. शैलेश काळे यांनी प्रशासकीय भरपूर माहिती असलेला हरेश हा माझा जवळचा सोबती असून त्याच्याशी असलेली मैत्रीचे नाते व असल्रेला विश्वास कायम राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नाजीम नालखंडे, किशोर म्हात्रे, ॲड. महेश पवार, राज वैशंपायन, नारायण म्हात्रे, दर्शना जवके, श्रेया कुंटे, प्रमोद हंबीर, प्रमोद कदम, महिला पोलीस मनीषा लांगी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog