🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

२६ वर्षानंतर दहावीच्या विद्यार्थांचे स्नेहसंमेलन

  जुन्या आठवणींना उजाळा  

रोहा (प्रतिनिधी) :-  शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी नोकरी व्यवसाय उद्योग व विद्यार्थिनी विवाह झाल्यामुळे मुला-बाळांसह संसारात गुंतलेल्या असतात. परंतु त्यांना आपल्या बालपणाची व शालेय जीवनाची प्रत्यक्षाने आठवण येते. रोहा येथील को. ए. सो. च्या मेहेंदळे हायस्कूल मध्ये १९९७-९८ साली दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे २६ वर्षानंतर स्नेहसंमेलन आयोजित केले होते. दिनांक २ जून २०२४  रोहा येथील निसर्गरम्य अशा तांबडी भागातील नक्षत्र फार्म हाऊस येथे निरनिराळ्या मुंबई , पनवेल, आलिबाग, पुणे, चौल, रेवंदंडा, बोरिवली, ठाणे, आदि भागातील मुल-मुली एकत्र जमली या मंगलमय आणि अस्मरणीय दिवशी सर्वजण आनंदी आणि उत्साही होते. शाळेत असताना आणि शिक्षण घेताना सरांचे ओरडणे, रागावणे, वेळ प्रसंगी छडीचा धाक तितकाच शिकवताना त्यांची मेहनत आजदेखील डोळ्यासमोरून जात नाही. या आठवणी नेहमी उजाळा देत असतात. सामुदायिक भोजन, गप्पा, मनोरंजन, किस्से, त्यावेळचा नकलीपणा अगदी सर्वांनाच भावत होता.


आता जरी व्यवसायात उद्योग नोकरी निमित्त आणि सर्व संसारात गुंतले असले तरी त्या आठवणींनी सर्वांचेच डोळे ओलावले. काहींना रडू देखील आवरत नव्हते. अशा प्रकारे आपले कार्यक्रम वर्षभरात झाले पाहिजेत असे त्यावेळी सर्वांनी ठरविले. जीवनात असे प्रसंग नेहमी येतं नाहीत. परंतु आठवणी कायम ह्रुदयात साठवून ठेवल्या जातात. आपल्या कुटुंबांची मुलांची खुशाली सर्व प्रकाराची विचारपुस करून विचारांची देवाण घेवाण केली. त्यावेळी १० वीचे शिक्षक गुरुवर्य श्री. बी. आर. भादेकर सर यांना देखील हा कार्यक्रम पाहून अतिशय आनंद झाला. कारण आता आमच्यात समजुदार पणा होता सर म्हणाले वर्गात मस्ती करणारी हीच काय ती मुल आज माझा मनापासून सत्कार करीत आहेत. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी नियोजन भालचंद्र पवार, राजेश काफरे, शिवाजी पाटील, विश्वजित लूमण यांनी केले. तसेच यावेळी शाळेचे विद्यार्थी सुनैना पवार, माधुरी म्हात्रे, प्रज्ञा वारंगे, आदेश संसारे, परेश देशमुख, रवि इंदलकर, सचिन कदम, बाळू पडवळ, राम खांडेकर, शैलेश पवार, जयेश चांदगावकर, सुयोग वाटवे, तुषार भोजने, जगदिश देशमुख आदी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog