🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज


रायगड (प्रतिनिधी) :- रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि 4 जून  रोजी स. 8 वा. अलिबाग, नेहूली येथील  क्रीडा संकुलात मतमोजणीस सुरुवात होणार आहे.32 रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मतदानाची टक्केवारी

रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे 2024 रोजी एकूण 2 हजार 185 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण 60.51 टक्के एवढे मतदान झाले. 

पेण 64.51टक्के, 

अलिबाग 66.67%, 

श्रीवर्धन 59.20%,

महाड 57.56%, 

दापोली 57.37% 

गुहागर 56.44% 

अलिबाग नेहूली येथील  क्रीडा संकुलात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक  मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. 

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. 

191 पेण विधानसभा मतदारसंघासाठी 14  टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 27फेऱ्या होणार आहेत. 

192 अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील.

193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 26 फेऱ्या होणार आहेत. 

194 महाड विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्यात येणार असून 29 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

263  दापोली विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 27 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

तर 264 गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

 टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र  मतमोजणी टेबल लावण्यात आलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog