मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील ‘संघर्षयोद्धा’ सिनेमा होणार प्रदर्शित
खालापूर (साबीर शेख) :- मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर 21 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या सिनेमाबाबत सिने रसिकांसोबतच मराठा बांधवांमध्ये उत्सुकता असताना 18 मे रोजी खोपोलीतील चंद्रविलास मंगल कार्यालयात या चित्रपटाचे टीझर सिनेमामध्ये भुमिका साकारणारे सिने कलाकार रोहन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित झाले आहे.
यावेळी सकल मराठा समाज समन्वयक डॉ.सुनील पाटील, विनोद साबळे, शंकरराव थोरवे, प्रभाकर देशमुख, किरण हडप, संकेत हडप, नितीन मोरे, तुळशीराम पाटील, भानुदास पालकर, प्रकाश पालकर, अनिल भोसले, राजेन्द्र पाटील धनश्री दिवाणे, कविता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी अनेक आंदोलन करणारे मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अनेक आंदोलनातून महाराष्ट्राला आदर्श घडवून दिल्याने त्यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाची अनेकांना उत्सुकता असताना शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर लवकरच दिसणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 21 जूनला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, तर अभिनेता रोहन पाटील 'संघर्षयोद्धा' या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली असून गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची निर्मिती व शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शक केला आहे.
मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांतीसुर्य मनोज जरांगे - पाटील यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असताना 18 मे रोजी या चित्रपटाचा टीझर खोपोलीत प्रदर्शित झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आरक्षण योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं, महाराष्ट्रभर दौरा केला, त्यांच्या जीवनातील संघर्षावर आता एक सिनेमा येतो आहे. या सिनेमाबाबत सर्वांनाचं उत्सुकता असून सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पहावा, जेणेकरून आपल्या सर्वांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संघर्षमय जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे.
- डॉ. सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष तथा राज्य समन्वयक : सकल मराठा समाज