पनवेलच्या ओरायन मॉलच्या शॉप अँड विन स्पर्धेतील महापुरस्काराचे मानकरी दुर्वेश विरेकर आणि जयंता दास

ब्रँड वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे ओरायन मॉल - अभिनेत्री केतकी माटेगावकर

पनवेल (साबीर शेख) :- परदेशातील विविध वस्तूंचे ब्रँड पनवेलच्या ओरायन मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत,त्यासाठी बाहेर जायची गरज नाही,अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने पनवेलच्या ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिली.याप्रसंगी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर, सेंटर हेड प्रियांका उदेशी व ऑपेरेशन मॅनेजर सारिका हजारे आदी उपस्थित होते.

ओरायन मॉलतर्फे ग्राहकांसाठी शॉप अँड विन स्पर्धा आयोजित केली होती.या समारंभात लकी ड्रॉ द्वारे सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली,त्यामध्ये प्रथम दुर्वेश विरेकर तर द्वितीय जयंता दास हे शॉप अँड विन महापुरस्काराचे मानकरी ठरले.विजेत्यांना ओरायन मॉल तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेॲम्प् तर्फे ई बाईक बक्षीस मिळणार आहे,या समारंभासाठी महिला आणि तरुणाईची मोठी गर्दी होती.यावेळी केतकीने,मला वेड लागले प्रेमाचे... हे गाणे गायले,ग्राहकांमधील राजश्री यादव ही तिच्यासोबत गाणे गाण्यासाठी होती.केतकी माटेगावकर हिने हे गाणे गाऊन पनवेलकरांना अक्षरशः वेडावून सोडले.या मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील असे बाजारातील देशी-विदेशी वस्तूंचे ब्रँड एका चांगल्या वातावरणामध्ये उपलब्ध आहेत ही पनवेलकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत  अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला ओरायन मॉलतर्फे भेटवस्तू व स्वागत स्वीकारले.  या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक व अभिनेते सागर चव्हाण यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या स्पर्धेकरता बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहकार्य लाभले.

Popular posts from this blog