BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS...
अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला... अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला... नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Image
कोल्हापुरात अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलीसांच्या ताब्यात! कोल्हापूर वृत्त (संभाजी पुरीगोसावी) :-   कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यांत भडगांव येथील सौ. सुनीता संजय केसकर (वय 40) हिचा मृत्यू वनप्राण्यांच्या हल्ल्यातून झाल्याचा बनाव अखेर गडहिंग्लज पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी आणि सुनीता केसकर या दोघांचे सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय 34) रा. भडगांव याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सुनुता ही 18 जानेवारी आठवडी बाजारीसाठी घरांतून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 21 दिवसांनी महागांव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदे आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती व्यक्ती जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना चांगलाच संशय आला. मात्र तपासाच्या अनुषंगाने ...

किल्ले रायगडावरील पायवाट दि. 23 व 24 मे रोजी बंदचे आदेश जारी

पेझारी/रायगड (मुजाहिद मोमीन) :- रायगड किल्ल्यावर महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेण्याकरीता दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शविली असून हे काम दि.23 मे व 24 में 2024 रोजी त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. याकरिता किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरीमार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या अनुषंगाने दि.23 व 24 मे 2024 रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंदचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

किल्ले रायगडावर यावर्षी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दि. 06 जून 2024 व तिथीनुसार दि.20 जून 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरीता राज्यातील मोठयाप्रमाणात नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तीं उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या कार्यक्रमाच्या अगोदर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेला कडा हा अतिउंच असल्याने केवळ प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने मोकळे दगड काढणे शक्य आहे. हे मोकळे दगड काढीत असताना पायरी मार्गावरून होणाऱ्या पर्यटकांची पायी वाटचाल बंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होणार नाही. या कालावधीत पर्यटक,स्थानिक नागरीक पायवाटेने गड चढ-उतार होणार नाहीत याबाबत स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog