तहसील कार्यालयावर रोहेकरांची धडक! कुंडलिका नदी प्रदूषणावर प्रशासनाला जाब रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- कुंडलिका नदीत सर्रासपणे गटारांचे सांडपाणी आणि रसायनमिश्रित घाण सोडली जात असल्याच्या संतापातून रोहेकरांनी आज तहसील कार्यालयावर धाड टाकत प्रशासनाला अक्षरशः जाब विचारला. कुंडलिका नदी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सुधीरकुमार यादव, ऊदय करडे, महेश बामुगडे, सुरेन्द्र निंबाळकर, प्रथमेश शिर्के, ॲड दिपक भगत, यज्ञेश भांड, उध्दव आव्हाड, सौ. अलेफिया रोहावाला आदी मान्यवर उपस्थित होते. “नदी वाचवायची की प्रदूषणाला मोकळे रान द्यायचे?” असा थेट सवाल करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील गटारांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कुंडलिका नदीत सोडले जात असल्याने नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही नगरपरिषद आ...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भुवनेश्वर (रोहा) यांचा ३१ वा वर्धापनदिन संस्थेच्या कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सहकार, विश्वास आणि पारदर्शकतेची परंपरा जपणाऱ्या या पतसंस्थेच्या वाटचालीचा गौरव करण्यासाठी पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पांडुरंग सरफळे (रावसाहेब) होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरीवले, संचालक मनोहर मेहेतर, संदीप सरफळे, दीपक जाधव, जगदीश दामाणी, हेमंत राणे, महेश बामुगडे, सौ. सुलभा पवार, विनायक पवार, व्यवस्थापिका बंदिनी धनावडे, निता शिंगृत, विश्वास खेरटकर, किरण शिंगृत, रुपेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सचिव सुहास खरीवले यांनी उपस्थित पदाधिकारी व संचालकांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मनोगत व्यक...

Comments
Post a Comment