🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी 

मतमोजणी अनुषंगाने तयारीचा घेतला आढावा


रायगड (प्रतिनिधी) :- 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. 4 जून रोजी नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलात स. 8 वाजेपासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी आज पाहणी केली. तसेच तयारीच्या अनुषंगाने संबंधिताना सूचना दिल्या. 

यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महेश पाटील, अधीक्षक अभियंता सुखदेवे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्याचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके या अनुषंगाने पाहणी करून चर्चा करण्यात आली. तसेच केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

वाहनतळांची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल, याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी, अशा सूचना श्री जावळे यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog