थकबाकीदारावर मेहेरबानी, तर रोहेकरांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर - शैलेश रावकर रोहा नगरपालिकेचा अजब कारभार! रोहा, दि. ११ (प्रतिनिधी) :- रोहा अष्टमी नगरपरिषदेचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे नगरपालिकेने शहराच्या विकासाच्या नावाखाली तब्बल चार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आपल्या उरावर घेतला असताना, दुसरीकडे मात्र लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्या संस्थेला झुकते माप दिले जात असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे तालुका सरचिटणीस शैलेश रावकर यांनी केला आहे. या दुटप्पी धोरणामुळे रोहेकर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. काय आहे नेमके प्रकरण? रोहा नगरपालिकेच्या आरक्षण क्र. १४ मधील इमारतीमधील १५ गाळे आणि २ मॉल 'फर्स्ट चॉईस हेल्थ प्रा. लि.' या संस्थेने भाड्याने घेतले आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी पालिकेने कोट्यवधींचे कर्ज काढले आहे. मात्र, ही संस्था पालिकेचे देणे देण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर आणि भाडे असे मिळून सुमारे १७ लाख रुपये या संस्थेकडून येणे बाकी आहे. असे असतानाही या थकबाकीदाराचे 'लाड' कशासाठी? असा सवाल शैलेश रावकर यांनी केला आ...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
‘अ स्टेप अहेड स्कूल’ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुलांनी घेतला सुसंस्कारांचा वारसा संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई महिला आघाडीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन बोरीवली-मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिवाजी नगर येथील ‘अ स्टेप अहेड स्कूल’ मध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूनम शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला. समाजातील बालवयातील मुलांवर महापुरुषांच्या विचारांचे संस्कार व्हावेत आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात अतिशय मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात 'त्रिवार पंचशील वंदनेने' करण्यात आली. यावेळी ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटली. स्पर्धेनंतर सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांना ...




Comments
Post a Comment