नागोठणे येथे जमातुल मुस्लिमीनतर्फे उत्साहात 'इफ्तार' संपन्न; जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांची प्रमुख उपस्थिती नागोठणे (सुहेल पानसरे) :- पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून नागोठणे येथे सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'जमातुल मुस्लिमीन नागोठणे' यांच्या वतीने रोजेदारांसाठी भव्य इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पोलीस प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थिती लावून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुमितजी काते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली, तर नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांची देखील विशेष उपस्थिती लाभली. आज रमजान महिन्याचा २५ वा रोजा असून पहाटे ५:२४ वाजता सहरी केल्यानंतर सायंकाळी ६:५० च्या सुमारास इफ्तारची वेळ झाली होती. यावेळी जुम्मा मस्जिद नागोठणे यांचे इमाम जनाब जव्वाद मापकर यांनी विशेष प्रार्थना (दुआ) केली, ज्यामध्ये देशामध्ये शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहावा अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी उपसरपं...
www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com
Popular posts from this blog
नागोठणे जुम्मा मशिदीत ईद-उल-फित्रचा उत्साह पोलीस प्रशासनाकडून गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा नागोठणे, दि. २१ (सुहेल पानसरे) :- पवित्र रमजान महिन्याच्या उपवासांची सांगता झाल्यानंतर आज, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी, नागोठणे शहरात ईद-उल-फित्रचा सण अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील ऐतिहासिक नागोठणे जुम्मा मशिदीमध्ये सकाळी ठीक ८:०० वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. या सामूहिक नमाजचे नेतृत्व मशिदीचे शाही इमाम जनाब जव्वाद मापकर यांनी केले. नमाज संपन्न झाल्यानंतर इमाम साहेबांनी उपस्थित भाविकांना खुतबाद्वारे धार्मिक मार्गदर्शन केले आणि त्यानंतर देश-दुनियेत शांतता व प्रगती नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली. दुआ आणि नमाजचा विधी पूर्ण झाल्यानंतर मशिद कमिटीच्या वतीने जनाब शब्बीर पानसरे यांनी उपस्थित संपूर्ण जमातुल मुस्लिमीनला ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागोठणे पोलीस स्टेशनने आपल्या सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवली. नमाज आटोपून बाहेर येणाऱ्या प्रत्येक नमाजीला पोलीस प...




Comments
Post a Comment