🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रोहा येथील शिक्षक सहकारी पतपेढी डुबण्याच्या मार्गावर? 

संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता 

   करोडो रूपयांची थकबाकी.!    

रोहा : विशेष प्रतिनिधी

कमी व्याजदाराने कर्ज देणारी संस्था म्हणून गेली ४७ वर्षे अविरत सेवा देणाऱ्या रोहा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीने उपविधी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले नसल्याने या वर्षी ही संस्था तोट्यात जात असल्याचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक (वर्ग १) सहकारी संस्था चौकशी अहवालात स्पष्ट झाले असून, ही संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

२०२२-२३ च्या आर्थिक जमाखर्च पत्रकात संस्थेने उपविधी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे  जिल्हा उपनिबंधक जिल्हा सहकारी संस्था रायगड यांच्याकडे सभासदांनी तक्रार दाखल केली आहे. याविषयी गंभीर दखल घेत लवकरच मा. उपनिबंधक संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक याशिवाय तक्रारकर्ते यांची एकत्रित सुनावणी आपल्या कार्यालयात ठेवणार आहेत. तसेच त्यांनी विशेष लेखा परीक्षणासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचे सुतोवाच देखील केले. 

सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेच्या सभासदाकडून ३१ मार्च २०२३ पूर्वी वसूल न झालेले व्याज व मुद्दल करोडो रुपयांमध्ये असल्याचे निदर्शनास आले. दिवंगत शिक्षक आणि सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी निवृत्ती वेतनातून कर्ज भरले नसल्याचा ठपका लेखा परीक्षणात ठेवला आहे. त्याचप्रमाणे एनपीएच्या तरतुदीनुसार थकीत सभासदांची वसुली न आल्यामुळे तरतूद न करता नफ्यामध्ये दाखविण्यात आले आहे. ही बाब संस्थेच्या उपविधीचे उल्लंघन करणारी असून यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. संस्थेच्या उपविधी क्रमांक १.४ नुसार संस्थेने ३१ मार्चला मुदती ठेवीवर व्याज आकारणी करुन व्याजाची तरतूद नफ्यातून करणे आवश्यक होते. पंरतु तसे न केल्यामुळे नफा-तोटा पत्रकावर परिणाम झाला असून नफा वाढवून बोगस नफा दर्शविलेला आहे. ही बाब संस्थेचे उद्देश व पोटनियमाचे उल्लघंन करणारी आहे. त्यामुळे संस्थेला उत्पन्न कमी व खर्च जास्त होत आहे. परिणामी ही संस्था भविष्यात डबघाईला निघण्याची शक्यता असून, संस्थेच्या अध्यक्ष, सरव्यवस्थापक व संचालक मंडळाने तफावत दूर करावी, अन्यथा संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. दरम्यान, सदर संस्थेचे २०२२-२३ चे विशेष लेखा परीक्षण करावे, अशी मागणी तक्रारकर्त्या सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog