लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूलमध्ये एसएससी गुणवंत व उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न वरळी-मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) :- प्रभादेवी व वरळी परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वरळी येथील प्रतिष्ठित 'लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूल' मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सर्वांगीण कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, याच दैदिप्यमान यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि गुणवंतांच्या कौतुकासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये गुजराती संस्कार मंडळाचे अध्यक्ष श्री. बिपीन भटाविया, सचिव सौ. सुजाता शहा, खजिनदार श्री. दिनेश नागडा आणि सदस्य सौ. आरती त्रिवेदी यांनी...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
पूर ओसरताच रोह्यात स्वच्छता मोहिमेला वेग! बाधित १,४०० नागरिकांना नगरपालिकेकडून जेवण रोहा-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या महापुरामुळे रोहा शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मध्यरात्री घरांमध्ये व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर भिजलेल्या साहित्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली होती. मात्र मंगळवारी पावसाने उसंत घेताच रोहा नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला वेग देत शहर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवरील कचरा हटविणे, नाल्यांची साफसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ व आवश्यक यंत्रसामग्री तैनात करण्यात आल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळत आहे. अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अष्टमीतील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, कासार आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाज...




Comments
Post a Comment