द. ग. तटकरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर सेवानिवृत्त
कोलाड : निलेश महाडीक
द. ग. तटकरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचे प्राचार्य शिरीष येरुणकर हे दि. ३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वारकरी सांप्रदाय क्षेत्रातील मान्यवर तसेच कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वयोमानानुसार सेवानिवृत्ती ठरली असली तरी शिरीष येरुणकर सर यांची सेवानिवृत्ती वेगळी आहे. कारण शिरीष येरुणकर यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्याच शाळेत ते शिक्षक सेवेत रुजू झाले. त्यांची ओळख ही अतिशय शिस्तप्रिय शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले व त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर छोट्या शाळेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले. त्यामुळे ते याच हायस्कूलमध्ये प्राचार्य झाले व याच हायस्कूलमध्ये सेवानिवृत्त झाले.
शिरीष येरुणकर सर यांच्या विषयी बोलायचे म्हणजे ते भूगोल विषय शिकवायचे त्यांची भूगोल शिकवण्याची पद्धत इतकी सोपी होती कि सर्व विद्यार्थी मग्न असायचे, जणू भूगोल शिकवतांना काल्पनिक दुनियेत नेऊन जणू ब्रह्मांड फिरवून आण्याचे! या त्यांच्या शिकविण्याचा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे तोंडपाठ व्हायची. याचबरोबर आई-बाबांचे नाव कमवा ते तुमच्यासाठी आयुष्यभर झटतात, असे अनमोल मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करीत असत. तसेच बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी अनेक वेळा त्यांनी मद्दतीचा हात पुढे केला. यामुळे त्यांचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, राजकीय सामाजिक शैक्षणिक व वारकरी संप्रदाय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहून शिरीष येरुणकर सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.