ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

रोहा तहसिल कार्यालयातर्फे नवीन मतदार नोंदणी शिबीर

रोहा : किरण मोरे

एम. बी. मोरे महाविद्यालय धाटाव येथे नवीन मतदार नोंदणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले हेते. यावेळी एकूण २९ नवीन मतदार विद्यार्थ्यांचे फार्म भरून घेण्यात आले आणि अजूनही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेण्याचे सुरू आहे. तसेच ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षा विभागाचे उद्घाटन परिविक्षाधीन तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी नवीन मतदार नोंदणीबाबत व स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न म्हशेलकर, मंडळ अधिकारी भरत सावंत, प्राध्यापक मयूर पाखर, माधुरी जाधव, अक्षता ठाकूर, ग्रंथपाल निर्मला थोरात व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog