🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

माणगांवमध्ये `रॉयल` स्टाईलने हॉटेलमध्ये लॉजींगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तेजीत? 

१६ ते २८ वयोगटातील मुली तोंडाला रूमाल बांधून जातात लॉजमध्ये! 

हॉटेलच्या मालकांवरच कारवाई होणे गरजेचे

रायगड (किशोर केणी) :- माणगांवमध्ये "रॉयल" स्टाईलने सुरू असलेल्या हॉटेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असली तरी यातून अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी होत आहे. लॉजिंगच्या नावाखाली चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पायबंद कोण घालणार, असा संतप्त सवाल उपस्थित झालेला आहे. यामध्ये हॉटेल चालविणाऱ्यांबरोबरच हॉटेलच्या मालकांविरूद्ध स्त्रिया आणि मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. 

या परिसरात काही व्यावसायिकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून आलिशान लॉजिंग उभारलेले आहे. या लॉजिंगमध्ये नेमके कोणते उद्योग चालतात, याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाही येत नाही. परंतु आंबटशौकिनांना या उद्योगाची पुरेपूर माहिती आहे. बाहेरून 'कॉलगर्ल' मागवून त्यांना प्रवासी म्हणून दाखवणे आणि "धंदा" करून घेणे, असाच उद्योग या लॉजिंग व्यावसायिकांनी चालविला आहे. गिऱ्हाईक मिळविण्यासाठी सोशल मिडीयाचा देखील वापर करण्यात येत असल्याची माहिती उजेडात आलेली असून "व्हाट्स अप" द्वारे तरूणींचे फोटो पाठवून गिऱ्हाईकांना आकर्षित केले जाते. १६ ते २८ वयोगटातील युवती तोंडावर रुमाल बांधून लॉजमध्ये येत असतात. त्यांना कोणी दुचाकीने आणून सोडतात. काही ऑटोरिक्षामधून येतात. यात काही अनेक अल्पवयीन मुलीसुध्दा असतात. त्यामुळे याठिकाणी आंबटशौकिनांची मोठी गर्दी असते.

शासनाने लॉजिंग चालविण्यासाठी कडक नियम घालून दिले. लॉजचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे. लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख रजिस्टरमध्ये आवश्यक असतो. परंतु असे कोणतेही नियम लॉजिंग व्यावसायिकांकडून पाळले जात नाही. येथे अशा प्रकारचे अनैतिक धंदे सुरू असताना देखील या हॉटेल्सवर कारवाई का होत नाही? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Comments

Popular posts from this blog